सलमानच्या ‘भारत’ने रचला ‘हा’ विक्रम


सलमान खान आणि कतरिना कैफची जादु ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे. या दोघांचीही जोडी दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत तिसऱ्यांदा एकत्र येत पुन्हा एकदा हिट ठरली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करुन यावर्षीचा बिगेस्ट ओपनर ठरलेल्या या चित्रपटाने चारच दिवसात शंभर कोटीचा आकडा पार केला आहे.

आत्तापर्यंत १३० कोटींचा गल्ला ‘भारत’ने जमवला आहे. सलमान खान हा या चित्रपटाद्वारे सर्वाधिक शंभर कोटी गल्ला जमवणाऱ्या चित्रपटाच्या यादीत अव्वल ठरला आहे. त्याच्या आत्तापर्यंत १४ चित्रपटांनी शंभर कोटीची कमाई केली आहे. त्यापैकी ३ चित्रपट हे ३०० कोटी तर, २ चित्रपट हे २०० कोटींचा गल्ला जमवणारे आहेत.

पण चित्रपटाच्या कमाईवर सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमुळेही परिणाम होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. तब्बल ४७०० स्क्रिन्सवर ‘भारत’ चित्रपट झळकला आहे. सलमान खान, कतरिना कैफ यांच्याव्यतीरिक्त या चित्रपटात दिशा पटाणी, तब्बु, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर यांचाही समावेश आहे.

Leave a Comment