‘मर्द’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार रणदीप हुड्डा


दिग्दर्शक साई कबीर यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.


रणदीपच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मर्द’ असे आहे. प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. राजू चढ्ढा आणि राहुल मित्रा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. तर, हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.

Leave a Comment