रिहाना बनली जगातील सर्वात श्रीमंत महिला गायक


जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका, संगीतकार आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या दिलावर राज्य करणारी, प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार रिहाना बनली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, सहाशे मिलियन डॉलर्स कमावून रिहानाने इतर तमाम महिला गायिकांना मागे टाकत हा खिताब प्राप्त केला आहे. 600 मिलियन डॉलर्स कमावून रिहाना फोर्ब्सच्या या रिपोर्टमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या मॅडोना स्थानावर आहे, जिची एकूण कमाई 570 दशलक्ष डॉलर एवढी आहे. तिसरा नंबर बियॉन्सेचा लागतो, जिच्याकडे 400 मिलियन डॉलरची संपती आहे.

20 फेब्रुवारी 1988 साली 31 वर्षीय रिहानाचा जन्म झाली. बार्बेडीयन गायिका रिहाना ही फक्त गायिकाच नाही तर फॅशन डिझायनर, मेकअप उद्योजक, अभिनेत्री आणि एका संस्थेची संस्थापकही आहे. ती एका लक्झरी फॅशन हाऊसचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. ती चाहत्यांमध्ये जरी रिहाना या नावाने प्रसिद्ध असली, तरी अनेक व्यवसायांसाठी ती फँटी या नावाचा वापर करते. फँटी ब्युटीपासून एलव्हीएमएच (फ्रेंच फॅशन ग्रुप) पर्यंत रिहानाच्या सर्व फॅशन ब्रॅण्ड्सचे नाव फँटी हेच आहे.

आपली फॅशन कंपनी ‘सेव्हेज एक्स फँटी’ 2017 मध्ये रिहानाने लॉन्च केली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, कंपनीने लॉन्चच्या पहिल्या आठवड्यात 100 दशलक्ष डॉलर्स कमावले होते, तर कंपनीने गेल्या वर्षी 570 दशलक्ष डॉलर्स कमावले होते. कंपनीच्या यशस्वी घोडदौडीनंतर फँटी फॅशन व्हेंचरने फ्रेंच फॅशन ब्रँड एलव्हीएमएचशी भागीदारी केली होती. रिहानाची सर्वात जास्त कमाई याच फॅशन ब्रँड मधून होत आहे.

Leave a Comment