हुवाईच्या नवीन फोनमध्ये मिळणार नाही फेसबुकशी निगडित कोणतेही अॅप


चीनमधील मोबाईल उत्पादक कंपनीच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता सपेना. चीनकडून होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या चोरीमुळे काही दिवसांपूर्वी अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. आता चीनला फेसबुकनेही मोठा दणका दिला आहे. आता आपल्या कंपनीशी निगडीत असलेले कोणतेही अॅप हुवाई फोनमध्ये प्री-इन्स्टॉल केलेले मिळणार नसल्याचे फेसबुकने सांगितल्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम चीनची कंपनी असलेल्या हुवाईच्या फोनमध्ये प्री-इन्स्टॉल केलेले नसणार. अमेरिकेकडून बंदी घातल्यानंतर, अमेरिकन कंपन्यांनी याआधीच हुवाईसोबत व्यवसाय करणे थांबवले आहे.

अमेरिकेत बनलेले भाग आणि सॉफ्टवेअर आपल्या फोनसाठी हुवाई कंपनी वापरू शकत नाही. आता कंपनीला फेसबुककडूनही मोठा झटका मिळाला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, आधीपासूनच जे ग्राहक हुवाईचे फोन वापरत आहेत यानंतरही ते तसेच वापरू शकतील. या ग्राहकांना अपडेट्सदेखील मिळत राहतील. पण नवीन हुवाईच्या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारखी अॅप्स प्री-इंस्टॉल्ड मिळणार नाहीत.

याबाबत आतापर्यंत हुवाईकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान गुगलनेही हुवाईचा अँड्रॉइड परवाना रद्द केला आहे. कंपनी आता नवीन स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकत नाही. दरम्यान बऱ्याच काळापासून हुवाई कंपनी चीनी लष्करी किंवा सुरक्षा सेवांद्वारे गुप्तचर म्हणून काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेचे तंत्रज्ञान याआधी चीनकडे जाऊ नये म्हणून, हुवाईवर बंदी घालण्यात आली होती. आता युरोपातील देशही अशाच प्रयत्नात आहेत.

Leave a Comment