जगातील सर्वाधिक कमाई करणारे अॅप बनले पब्जी


मुंबई : पब्जी अॅपचा समावेश जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅपच्या यादीत झाला आहे. मे महिन्यात एका दिवसाला तब्बल 48 लाख डॉलर्सची कमाई (अंदाजे 33 कोटी) पब्जी अॅपने केली आहे. चीनच्या इंटरनेट पॉवरहाऊस टेनेसेंटच्या कमाईत ‘पब्जी मोबाईल’ आणि नवीन व्हर्जन ‘गेम फॉर पीस’मुळे ही वाढ झाली आहे. आता जगातील सर्वाधिक कमाई करणारा पब्जी अॅप बनले आहे.

मुळात पब्जीने कोटी डॉलर्सच्या रुपयात कमाई केली आहे. जर चीनच्या अँड्रॉईड माध्यमातून मिळालेल्या कमाईचा समावेश केला, तर पब्जी अॅपने 14.6 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. एप्रिलमध्ये पब्जीने 65 कोटी डॉलर्सची कमाई केली होती. मे महिन्यात पब्जी मोबाईल, गेम फॉर पीसने अॅप्पलकडून जवळपास 10.1 कोटी, गुगलच्या प्लॅटफॉर्मवरुन 4.53 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. कंपनीला पब्जीच्या कमाईने मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.

Leave a Comment