दहावीच्या निकालात 20 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी गुण


पुणे : आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 77.10 टक्के यंदा राज्याचा निकाल लागला असून तब्बल 12.31 टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. दरम्यान यंदाच्या निकालात तब्बल 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असल्याची माहिती शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी दिली.

राज्यातील 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास 12 लाख विद्यार्थी पास झाले. यातील तब्बल 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यात लातूरमध्ये सर्वाधिक 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये 3 विद्यार्थी आणि अमरावतीमधील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. दरम्यान यात मुंबई आणि पुण्याचा एकही विद्यार्थी नसल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment