या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते माहीचे नाव


टीम इंडियाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अफ्रिकेला नमवत आपल्या अभियानाला सुरुवात केली आहे. रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकवून सगळ्यांची मने जिंकली. पण या सामन्यात सर्वात चर्चा झाली ती महेंद्र सिंह धोनीच्या ग्लोव्हजची. भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह पॅरा स्पेशल फोर्सचे होते. बलिदान चिन्हही याला म्हटले जाते. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने लष्कराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडला नसल्यामुळे धोनीचे कौतुक केलं जात आहे. पण या प्रकरणावरून आता वादंग सुरू झाले आहे. दरम्यान, या सगळ्यात महेंद्रसिंह धोनीच्या अफेअरबद्दलही चर्चा होत आहे. त्याचे नाव आतापर्यंत कोणत्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

धोनीचे १२ वीत असताना त्याच्या वर्गमैत्रिणीवर एकतर्फी प्रेम होते. एकाच दोघे वर्गात शिकायचे. धोनीने एका कार्यक्रमात सांगितले होते की, १२ वीत असताना त्याचे स्वाती नावाच्या मुलीवर क्रश होते.

प्रियंका झा नावाच्या मुलीचा उल्लेखही महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकमध्ये केला आहे. चित्रपटात प्रियंकाची व्यक्तिरेखा दिशा पाटनीने साकारली होती. जेव्हा धोनी क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी परदेशात गेला होता तेव्हा प्रियंकाचा भारतात अपघाती मृत्यू झाला होता.

एक वेळ अशी होती दीपिकाचे नाव जेव्हा युवराज सिंह आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीसोबत जोडले गेले. दीपिका आणि माही एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र याबद्दल कधीही दोघांनी वाच्यता केली नाही.

धोनी आणि लक्ष्मी यांच्या नात्याबद्दल एकेकाळी खूप बोलले आणि लिहिले गेले. मीडिया रिपोर्टनुसार, धोनी आणि लक्ष्मीची ओळख २००८ मध्ये आयपीएलदरम्यान झाली. ते तेव्हापासून एकमेकांना डेट करत होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. दोघे अवघ्या वर्षभरात एकमेकांपासून वेगळे झाले.

धोनीशी बॉलिवूड अभिनेत्री असीनचे नावही जोडले गेले होते. दोघे २०१० मध्ये एका ब्रँडचे एम्बेसेडर होते. या दरम्यान, २०१० मध्ये आयपीएल सामन्यांमध्येही धोनीसोबत असीनला पाहण्यात आले होते.

ईडन गार्डनमध्ये भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान धोनी कोलकात्यातील ताज हॉटेलमध्ये थांबला होता. तेव्हा साक्षीशी त्याची ओळख झाली. २०१० मध्येच साक्षी आणि महेंद्रसिंह धोनीने लग्न केले.

Leave a Comment