पिकांना वाचवण्यासाठी बळीराजाने चक्क रोपांनाच नेसवल्या साड्या!


पाऊस लांबल्यामुळे राज्यावर दुष्काळी सावट आहे. पाण्याअभावी व प्रखर उन्हामुळे शेतातील कोवळी रोप करपत आहेत. अशावेळी पाऊस जोपर्यंत येत नाही या रोपांना तोपर्यंत जगवण्यासाठी चक्क रोपांना बायकांप्रमाणे साड्या एका शेतक-याने नेसवल्या आहेत. अन्य शेतकरी देखील याचप्रमाणे आपली पिक वाचवण्यासाठी विविध युक्त्या लढवत आहेत.

अशाच प्रकारे कडक उन्हापासून एका शेतातील कोवळ्या रोपांचे रक्षण करण्यासाठी या रोपांना बायकांप्रमाणे शेतक-याने साड्या नेसवल्या आहेत. या रोपांना दुरून पाहिलेतर शेतात काम करत असलेल्या बायकाच उभ्या असल्याचे आपल्याला क्षणभर वाटते. हे दृश्य कॅमे-यात प्रसिद्ध पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी टिपले असून, त्यांनी हा फोटो फेसबुकवरही शेअर केला आहे. त्यांनी या फोटाबाबत गावोगाव बायका शेतात राबताना दिसतात. तशीच बायकांची गर्दी वाटली लांबून. जवळ गेल्यावर लक्षात आले झाडाच्या रोपांना साड्या नेसवल्याचे, म्हटले आहे. अरविंद यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या फोटोला अनेकांना लाइक करत त्यांच्या दृष्टिकोनाचे कौतुकही केले आहे. शिवाय अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत.

Leave a Comment