नवऱ्याच्या पगारावर बायकोचा 30 टक्के हक्क – उच्च न्यायालय


नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने नवऱ्याच्या पगारावर बायकोचा 30 टक्के हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बायकोचा अधिकार नवऱ्याच्या एक तृतीयांश पगारावर असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. नवऱ्याच्या पगाराच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. नवऱ्याच्या पगाराची दोन भागात विभागनी होत असून, त्यातील एक भाग बायकोला दिला गेला पाहिजे. न्यायालयाने हा निर्णय एका महिला याचिकाकर्त्याच्या अर्जावर सुनावणी करताना दिला आहे. नवऱ्याच्या पगारातील 30 टक्के हिस्सा महिलेला मिळालाच पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

7 मे 2006 साली महिलेचे लग्न झाले होते. सीआयएसएफमध्ये तिचा नवरा इन्स्पेक्टर आहे. दोघेही 15 ऑक्टोबर 2006 रोजी विभक्त झाल्यानंतर महिलेने पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. बायकोला 21 फेब्रुवारी 2008 रोजी पोटगी ठरवण्यात आली. त्याअंतर्गत नवऱ्याच्या पगाराचा 30 टक्क हिस्सा बायकोला देण्याचे ठरले. या निर्णयाला महिलेच्या नवऱ्याने आव्हान दिल्यानंतर तो भत्ता 30 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्यात आला. त्यानंतर महिलेने दिल्ली उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले.

बायकोच्या खात्यात कोण कोण पैसे टाकते, याची माहिती नवऱ्याच्या वकिलांनी न्यायालयात मागवली. तर महिलेला खर्चासाठी वडीलही पैसे देत असल्याचे समोर आले. पण न्यायालयाने त्यानंतर पुन्हा एकदा बायकोला 30 टक्के पोटगी देण्याचा निर्णय दिला. नवऱ्याच्या पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसार महिलेला 30 टक्क्यांच्या लाभ देण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment