प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राऊडी राठोड’चा येणार सिक्वेल


सध्या सिक्वेल चित्रपटांचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड चालू सुरु असून ‘जुडवा २’, ‘स्टूडेंन्ट ऑफ द ईयर २’ हे चित्रपट नुकतेच रिलीज होऊन गेले. त्यानंतर आता ‘कूली नं.१’ आणि ‘किक’चा सिक्वेल येण्याच्या वाटेवर आहे. त्यातच आता प्रभूदवा दिग्दर्शित २०१२ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘राऊडी राठोड’ चित्रपटाचाही सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद ‘राऊडी राठोड’ला मिळाला होता. आता सात वर्षांनंतर या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल येण्याची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राऊडी राठोड २ चे लिखाण सुरु असल्याची माहिती आहे. अक्षय कुमार या सिक्वेलमध्येही प्रमुख भूमिका साकारण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारसोबत पहिल्या ‘राऊडी राठोड’मध्ये सोनाक्षी सिन्हाने स्क्रिन शेअर केली होती. या सिक्वेलमध्ये आता अक्षयसोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राऊडी राठोड २ चित्रपटाच्या शूटिंगला पुढील वर्षी सुरुवात केली जाऊ शकते. अक्षयने ‘राऊडी राठोड’मध्ये डबल रोल साकारला होता. एसएस राजामौली यांचा साउथ चित्रपट ‘विक्रमरकुडू’चा ‘राऊडी राठोड’ रिमेक होता. प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळाली होती. चित्रपटातील गाणीही ब्लॉकबस्टर ठरली होती.

Leave a Comment