
१४.५ मिलियन युरो कर बुडवल्याचा आरोप सुपरस्टार शकीरावर लावण्यात आला असून तिला बार्सिलोनातील न्यायालयात कर बुडवल्याप्रकरणी हजर होण्याचे सांगण्यात आले होते. पत्रकार, फोटोग्राफर्स आणि टेलिव्हिजन कॅमेरांपासून लपत शकीरा न्यायालयाच्या परिसरात पोहचली. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता शकीरावर लावण्यात आलेल्या आरोपांची सुनावणी सुरु होणार होती.
करबुडवल्या प्रकरणी गायिका शकीरा न्यायालयात हजर
फुटबॉलपटू गेर्रार्ड पीके आणि आपल्या दोन मुलांसह अमेरिकन गायिका शकीरा स्पेनमध्ये राहते. तिने आणि तिच्या एका सल्लागाराने फसवणूक करत २०११ ते २०१४ पर्यंत स्पेनमध्ये राहत असूनही कर भरला नसल्याचा आरोप शकीरावर लावण्यात आला आहे. परंतु, स्पेनमधील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शकीराने संपूर्ण कर वसूली केल्याचे सांगण्यात आले आहे.
