मुघल शासक अकबराबद्दल राजस्थानमधील भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य


जयपूर : मुघल शासक अकबराबद्दल भारतीय जनता पक्षाचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अकबर महिलांच्या वेशात मीनाबाजारात जात होता. तेथील महिलांची छेड काढायचा, असे वक्तव्य सैनी यांनी केले त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

देशभरात गुरुवारी मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सैनी यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला.

सैनी म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीची महानता त्याच्या चरित्रावरुन समजते. महिलांच्या वेशात अकबर मीना बाजारात जायचा. तिथे जाऊन महिलांसोबत दुष्कर्म करायचा. सैनी पुढे म्हणाले की, दुष्कर्म म्हणजे छेडछाड. दरम्यान सैनी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने राग व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा याबाबत म्हणाल्या की, ज्या प्रकारची भावना सैनी यांनी व्यक्त केली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे.

Leave a Comment