पुढील ईदला रिलीज होणार भाईजानचा ‘ईन्शाअल्लाह’


सलमान खानने संजय लिला भन्साळींसोबत ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटासाठी काम केले होते. दोघांनीही या चित्रपटानंतर म्हणजेच सुमारे १९ वर्ष एकमेकांसोबत काम केले नाही. आता सलमानच्या चाहत्यांना त्याच्याकडून पुढील ईदला मोठे गिफ्ट मिळणार आहे.


सलमान संजय लिला भन्साळींचे दिग्दर्शन असणाऱ्या ‘ईन्शाअल्लाह’ या चित्रपटाद्वारे २०२०च्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी केली आहे. तर सलमानसोबत या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे.

आलिया आणि सलमान या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्यामुळे हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरणार आहे. ‘भारत’नंतर आता भाईजानच्या या बिगबजेट चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment