शाहरुखसाठी चित्रपट बनवणार राजकुमार हिराणी


गेल्या काही वर्षांपासून अभिनेता शाहरुख खान त्याच्या करियरच्या बॅडपॅचमधून जात आहे. बॉक्स ऑफिसवर अलीकडच्या वर्षात रिलीज झालेले ‘दिलवाले’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘फॅन’ आणि ‘झिरो’ हे त्याचे चित्रपट फारसे काही करु शकले नाही. त्याला पुन्हा एकदा सुपरहिट चित्रपटाची आता प्रतीक्षा आहे. आता शाहरुखसाठी बॉलिवूडचा हुकमी यश मिळवणारा दिग्दर्शक राजकुमार हिराणी चित्रपट बनवणार आहे.

शाहरुखचे चित्रपट हे लव्हस्टोरीवर आधारित असतात. ते आपण पाहिलेच आहे. त्यामुळे त्याला किंग ऑफ रोमांस म्हणतात. त्याला घेऊन असाच रोमंटिक चित्रपट हिराणी बनवणार असल्याची चर्चा आहे. शाहरुखला यापूर्वीच हिराणींसोबत चित्रपट बनवण्याची इच्छा होती. पण तो योग जळून आला नाही. ते या निमित्ताने एकत्र काम करतील आणि त्यांची केमेस्ट्री शाहरुखच्या यशाला पुन्हा झळाळी देईल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Leave a Comment