कोणत्या खासदाराला दिल्लीत कुठे मिळाला बंगला?


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लवकरच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांना बंगला आणि फ्लॅट मिळणार आहे. सध्या अस्थायी ठिकाणी खासदार राहत आहेत. पण लवकरच गृह समितीकडून बंगले आणि फ्लॅटची वाटप केली जाईल. एकूण 517 घरे लोकसभा पूलमध्ये आहेत, ज्यात टाईप-8 बंगल्यापासून ते छोट्या फ्लॅटचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिली समिती नव्या लोकसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर नियुक्त केली जाईल आणि घरांचे वाटप होईल. सध्या 250 नव्या खासदारांचा निवास विविध राज्यांची भवने आणि वेस्टर्न कोर्टात आहे.

नव्या खासदारांनी त्यांच्या आवडीनुसार फॉर्म जमा केला आहे. खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार डेटा हाऊस कमिटीला दिला जाईल आणि या आधारावरच कमिटीकडून बंगल्यांच्या वाटपासाठी नियम लक्षात घेतले जातील. विविध श्रेणींमध्ये हाऊस कमिटी उपलब्ध असलेले फ्लॅट आणि त्यासाठी मिळालेले अर्ज याच्या आधारावर निर्णय घेते.

लोकसभा पूलमध्ये राहण्याच्या ठिकाणांमध्ये 159 बंगले, 37 ड्युअल फ्लॅट, 193 सिंगल फ्लॅट, 96 बहुमजली इमारतीमध्ये आणि 32 घरे विविध ठिकाणी आहेत. सेंट्रल दिल्ली, नॉर्थ एवेन्यू, साऊथ एवेन्यू, मीना बाग, बिशम्बर दास मार्ग, बाबा खडक सिंह मार्ग, टिळक लाईन आणि विठ्ठल भाई हाऊसमध्ये ही घरे उपलब्ध आहेत. सर्व विद्यमान खासदारांना घर खाली करण्यासाठी 24 मेपासून एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

टाईप-5 निवासस्थानांमध्ये चार श्रेणी आहेत. टाईप-5 (ए) एक ड्रॉईंग रूम आणि एक बेडरूम सेट, टाईप-5 (बी) एक ड्रॉईंग रूम आणि दो बेडरूम सेट, टाईप-5 (सी) ड्रॉईंग रूम आणि तीन बेडरूम सेट, तर टाईप-5 (डी) ड्रॉईंग रूम आणि चार बेडरूम सेट आहे. संयुक्त फ्लॅट टाईप-(ए/ए), संयुक्त फ्लॅट टाईप-5 (ए/बी) आणि संयुक्त फ्लॅट टाईप-5 (बी/बी) उपलब्ध आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, नियम हाऊस कमिटीकडून तयार केले जातील. पण वरिष्ठ सदस्यांना सर्वोच्च श्रेणीतील बंगले दिले जातात. लोकसभा अध्यक्षाच्या परवानगीने विद्यमान खासदारांना आणखी चार महिन्यांसाठी राहू दिले जाऊ शकते. तर प्रकृतीच्या कारणास्तव आणखी सहा महिने मुदतवाढ दिली जाऊ शकते. अनेक खासदार यावेळी पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. त्यामुळे कोणते निवासस्थान कुणाला मिळते याबाबत सर्वच खासदारांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment