आता बस आणि रेल्वेची ‘लाईव्ह लोकेशन’ सांगणार गुगल मॅप


मुंबई : सार्वजनिक वाहने ही नेहमीच उशीरा धावतात अशी आपल्यापैकी कित्येकांची धारणा असते. आता गूगल मॅपने प्रवाशांच्या या समस्याचे निदान शोधून काढले आहे. आता गूगल मॅप देशातील प्रमुख दहा शहरांमध्ये बसने प्रवास करतानाचा लागणारा वेळही दाखवणार आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेची सध्याची स्थितीची माहितीही गूगल मॅपवर उपलब्ध होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीने म्हटले आहे कि, प्रवासी रिक्षा आणि इतर सार्वजनिक वाहनांचेही पर्याय गूगल मॅपवर उपलब्ध असतील. प्रवाशांना या सेवेमुळे सार्वजनिक वाहनाच्या माध्यमातून आपला प्रवास सुखकर आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.

गूगल मॅपचे प्रकल्प व्यवस्थापक तायलाह हसबल्लाह यांनी सांगितले की, आम्ही गूगलमध्ये असे काही फीचर जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, जास्तीत जास्त चांगले अनुभव ज्यामुळे प्रवाशांना मिळायला हवे. आम्हाला आशा आहे की, हे नवीन फीचर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल. या फीचरमुळे प्रवाशांना दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, पुणे, लखनऊ, चेन्नई, मैसूर, कोयंबतूर आणि सुरत या शहरांमध्ये बसची लाईव्ह माहिती दिसेल.

Leave a Comment