टाकाऊ प्लास्टिकपासून होणार इंधनाची निर्मिती


अवघ्या जगाला नैसर्गिक इंधन साठा संपण्याची भीती भेडसावात असतानाच एक दिलासादायक शोध अमेरिकेतील संशोधकांनी लावला आहे. अद्याप या शोधातून आलेले सकारात्मक निष्कर्श प्राथमिक अवस्थेत असले तरीसुद्धा जगभरातून या शोधाचे कौतुक होत आहे. या संदर्भात ‘अप्लाईड एनर्जी’ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आता कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मितीचा शोध अमेरिकन संशोधकांनी लावला आहे. विमानासाठीही हे इंधन वापरता येऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

पाण्याच्या बॉटल्स आणि टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करण्याची नवी पद्धत वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. हा शोध अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट यूनिवर्सिटीतील वैज्ञानिकांनी लावला आहे. या वैज्ञानिकांनी यासाठी प्लास्टिक अपशिष्टला एक्टिवेटेड कार्बनसोबत विशिष्ट तापमानापर्यंत वितळवले. प्रोफेसर हानवू लेई यांनी या संशोधनाबद्दल बोलताना सांगितले की, जगभरातच प्लास्टिक कचरा चिंतेचा विषय बनलेला असल्यामुळे हा शोध एक मैलाचा दगड ठरेल.

पाणी, दूध, तेल अशा अनेक पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉटल्स या प्रयोगासाठी वैज्ञानिकांनी वापरल्या. या बॉटल्सचे प्लास्टिक सुमारे 3 मिलिमीटर गव्हाच्या दाण्याला जितके दळावे त्याहीपेक्षा अधिक बारीक दळल्यानंतर हे प्लास्टिक ट्यूब संयंत्रात 430 ते 571 डिग्री सेल्सियस अंश एवढ्या उच्च तापमानापर्यंत एक्टिवेटेड कार्बनवर ठेवण्यात आले. अनेक निरिक्षणे केल्यानंतर संशोधकांना या प्लास्टिकचे तलसदृश्य पदार्थ आढळून आला.

Leave a Comment