मद्यपान करुन गाडी चालवल्यास दोन महिन्यांचा कारावास


नवी दिल्लीः मद्यपान करुन गाडी चालवणे आता महागात पडणार असून याकरिता कडक कायदा बनवण्यात आला असला तरी प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. दिल्लीतील न्यायालयात यासंदर्भातील एका प्रकरणात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यावेळी अशा मद्यपी वाहन चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा दिली पाहिजे, असे मत व्यक्त केलं आहे. साकेतमधील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनाली गुप्ता यांनी मद्यपान करुन गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या मोहन नामक एका व्यक्तीला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मद्यपान करुन गाडी चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच नशेच्या अवस्थेत पकडलेल्या गाडी चालकांना शिक्षाही फार कमी दिली जाते. शिक्षा कमी असल्याने दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याआहेत. त्यामुळे अशा चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे, असेही न्यायालयाने सुनावले आहे. तसेच मोहन यांना 3 हजारांचा दंडही भरावा लागला आहे.

Leave a Comment