साक्षी महाराजांची सामुहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात सदिच्छा भेट


सीतापूर : उत्तरप्रदेशच्या उन्नाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आणि भाजपचे वाचाळ नेते साक्षी महाराज हे काल सीतापूरला गेले होते. सामुहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी बांगरमऊचा आमदार कुलदीप सिंह सेंगरची यावेळी त्यांनी जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली.

कुलदीप सिंह यांना यावेळी साक्षी महाराजांनी यशस्वी आणि लोकप्रिय असल्याचे म्हटले. त्यांचे लोकसभा निवडणुकीनंतर आभार मानने योग्य वाटले म्हणून तुरुंगात भेटायला आलो, असे त्यांनी सांगितले. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. ईदनिमित्त बुधवारी सुट्टी होती. तुरुंग प्रशासनाने तरीही त्यांना भेटण्यास दिले. साक्षी महाराजांनी यासाठी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले. खूप काळापासून आमदार तुरुंगात आहेत. मी त्यांची समस्या आणि सुविधांची काळजी करू शकत नसल्यामुळे केवळ भेटण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Leave a Comment