346 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल


रायगड – आज स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 346 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रायगडावर याची पूर्वतयारी झाली असून लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आले आहेत.

आज रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले तसेच पाच देशाचे राजदूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची पूर्व तयारी करण्यासाठी स्वत: गुंतले होते. रायगड किल्ल्यावर राजसदरेवर फुलांची आरास, मंडप, रांगोळी याची जोरदार तयारी केली आहे. तर होळीच्या माळरानावर मैदानी कवायतीचे खेळ उपस्थितांसमोर सुरू झाले आहेत.

राज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यातून तसेच बाहेरून लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment