
लवकरच अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह आई बनणार असून आपल्या हॉट-बोल्ड फोटोमुळे ब्रुना नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते. तर एका वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या बेबीचे स्वागत करणार असल्याचे तिने म्हटले होते. तसेच ब्रुना हिने लग्नापूर्वीच आपण आई होणार असल्याचे म्हटले आहे.
लग्नापूर्वीच आई होणाऱ्या ब्रुना अब्दुल्लाहचे फोटो सोशल मीडियात व्हायरल
आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्रुना हिने दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये नोव्हेंबर 2018 ते जून 2019 मध्ये बॉडीमध्ये किती बदल झाला याबद्दल सांगितले आहे. तर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोत ब्रुना हिने बेबी बंप दाखवताना दिसून येत आहे.
ब्रुना हिने 25 जुलै 2018 मध्ये स्कॉटिश ब्रॉयफ्रेंड अॅलन फ्रासरसोबत ऐंग्जेमेंट केली होती. पण तिने अद्याप लग्न केलेले नाही. ब्रुनाने यापूर्वी सुद्धा आपल्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियात चर्चेत होती. तर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमुळे बेबी बंप प्लॉन्ट करताना दिसली आहे.
