सोशल मीडियात व्हायरल होत आहे मुंबईची तृतीयपंथीय रिक्षावाली


आपल्या समाज व्यवस्थेत तृतीयपंथीय हा विषय तसा जाणिवपूर्वक दूर्लक्षित ठेवलेला घटक असून सातत्याने समाजातील रुढी, परंपरा, जातियता आणि अनिष्ठ प्रकारांना आळा घालून त्यांचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होत गेले. त्याला किती यश आले हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. पण, तृतीयपंथीय हे असे असताना समाजव्यवस्थेचा अभ्यास करणारे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या मंडळींच्या केंद्रस्थानी फारसे कधी आलेच नाहीत. पण आता जमाना बदलला आहे. स्वत:चा आवाज तृतीयपंथीयांना प्राप्त झाला. रिक्षावाली मंजू अशा आवाजांपैकीच असून सध्या ती सोशल मीडियावर मुंबईची रिक्षावाली म्हणून चांगलीच व्हायरल झाली आहे.

मुंबईत तृतियपंथी समाजाचा घटक असलेली मंजू रिक्षा चालवते. समाजाच्या डोळ्यात डोळे घालून ताट मानेने जगते. समाजाकडून तृतियपंथी म्हणून नाकारले जाणे तिला मान्य नाही. ती तिच्या या हटके जीवनशैलिमूळेच लोकांचेही लक्ष वेधून घेते. मंजूबद्दलची माहिती आणि फोटो पूनम खींची नावाच्या एका तरुणीने तिच्या फेसबुकवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. मंजू ही माहिती आणि फोटो फेसबुकवर येताच सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

पूनम खींची या तरुणीच्या फेसबुक पोस्टनूसार, मंजू गेले पाच वर्षे रिक्षाचालक म्हणून काम करते. सुर्योदयानंतर सकाळी सुरु झालेल्या तिचा दिवस रात्री 11 वाजता संपतो. ती रात्री 11 नंतर रिक्षा चालवत नाही. कारण नसताना काही लोक जाणूनबूजून त्रास देतात. त्यामुळे आपण या लोकांच्या त्रासाला कंटाळून रात्री 11 नंतर रिक्षा चालवत नसल्याचे मंजू सांगते. तृतीयपंथीय असले म्हणून काय झाले? मी कमावते कष्टाची भाकरी!, असेही मंजू सांगते.

Leave a Comment