
मुंबई : रिलायन्स जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील आगमनानंतर या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. सर्व कंपन्यांना जिओमुळे सतत नवीन योजना सुरु कराव्या लागत आहेत. तसेच जुन्या योजना नव्याने लॉन्च केल्या जात आहेत. आता प्रीपेड वापरकर्त्यांसाठी व्होडाफोनने एक चांगली योजना सुरू केली आहे. २२९ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. यात २ जीबी ४ जी / ३ जी डेटा मिळतो. योजनेची वैधता २८ दिवस आहे.
व्होडाफोनच्या या प्लानमध्ये मिळणार दररोज २ जीबी डेटा आणि या सुविधा
स्थानिक, एसटीडी आणि २८ दिवसांच्या रोमिंग अमर्यादित कॉलिंगची सुविधा या योजनेमध्ये असणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस विनामूल्य आहे. याशिवाय व्होडाफोन प्ले स्टोअर थेट टीव्ही, मूव्हीचा २८ दिवसांचा फायदा घेऊ शकतात. व्होडाफोन प्ले अॅप डाऊनलोड करण्यासाठी टाइप करा प्ले आणि १९९ वर पाठवा.
१९९ रुपयांचा व्होडाफोनचा एक प्लान आहे. ज्या २२९ रुपयांच्या प्लानमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या योजनेत उपलब्ध आहेत. परंतु दररोज फक्त १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच, माय व्होडाफोन अॅपद्वारे १९९ रुपये रिचार्ज केले तर १००% कॅशबॅक मिळेल.
