अजगर गळ्यात घेऊन फोटो शूट करणे या अभिनेत्रीला पडले महागात


आपला टीव्ही शो असो अथवा चित्रपट हिट करण्यासाठी हे सेलिबेटी काहीही करु शकतात. कोणताही कलाकार आपल्या चाहत्याचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडण्यास तयार नसतात. पण एक अशी घटना श्रीलंकेत घडली ज्यामुळे आपला चित्रपट हिट करण्याच्या गडबडीत एका अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला असता. त्या अभिनेत्रीचे नाव दिगांगना असे आहे. दिगांगना सध्या आपल्या आगामी हिप्पी या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी श्रीलंकेत असून याच दरम्यान एका अजगराने तिचा गळा आवळल्याची घटना घडली आहे.

श्रीलंकेत तुम्ही चालत असताना तुमच्या वाटेत साप किंवा तत्सम प्राणी येणे हे खूप सामान्य मानले जाते. अशातच दिगांगनाच्या आगामी हिप्पी चित्रपटाच्या सेटवर एक गारुडी पोहचला. यावेळी अभिनेत्री दिगांगनाने त्याच्याकडील अजगरासोबत फोटो काढण्यासाठी गळ्यात घातला आणि फोटो क्लिक केले. पण अशातच गळ्यातील अजगराने अभिनेत्रीच्या गळ्याभोवती आपला फास आवळायला सुरुवात केली. पण दिगांगनाने धाडस करून या अजगराला आपल्या गळ्यातून खेचून बाजूला काढले आणि मोठी दुर्घटना टळली.

Leave a Comment