दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या समीरा रेड्डीचे बोल्ड फोटोशूट


लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाला अभिनेत्री अभिनेत्री समीरा रेड्डी जन्म देणार आहे. समीराने तिच्या पहिल्या मुलाला २०१५ मध्ये जन्म दिला. सध्या सोशल मीडियावर प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाचे नवे फोटो समीराने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने Beauty begins the moment you decide to be yourself 🌟 Coco Chanel असे लिहिले आहे.


समीरा शेवटची २०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात झळकली होती. तिच्याशिवाय या चित्रपटात अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. समीरा या चित्रपटानंतर बॉलिवूडपासून दूर झाली. यामागेही मुलाचे प्लॅनिंग हेच कारण होते. समीरा दुसऱ्या प्रेग्नंसीची बातमी शेअर करताना यावर बोलली होती. हा आमचा प्लान्ड बेबी आहे. त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टला नकार दिला होता, असे तिने सांगितले होते.


समीराने अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी मराठमोळा उद्योजक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक ती चालवायची. ती एक दिवस अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बाइक्सची समीराला विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.


२००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटाद्वारे समीराने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पण तिचे फिल्मी करिअर म्हणावे तसे फारसे यशस्वी ठरु शकले नाही. तिने नंतर आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. तिने अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.


उद्योगपती विजय माल्ल्यासोबत समीराचे खास नाते आहे. विजय माल्ल्यानेच समीराचे कन्यादान केले होते. माल्ल्याला समीरा अंकल संबोधते. माल्ल्याच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात समीरा दिसली आहे.

Leave a Comment