सीएमएस रिपोर्ट; भाजपने लोकसभा निवडणुकीत केले तब्बल 27 हजार कोटी खर्च


आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूक यंदाची लोकसभा निवडणूक ठरली आहे. कारण तब्बल 60 हजार कोटी रुपये या निवडणुकीत खर्च करण्यात आले आहेत. यापैकी एकट्या भाजपने जवळपास 45 टक्के म्हणजेच 27 हजार कोटींची रक्कम खर्च केली असल्याची माहिती सेंटर फॉर मिडीया स्टडीजने जाहीर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे. सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी ही शक्यता बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये वर्तविली आहे. या निवडणुकीच्या खर्चामध्ये सर्व भ्रष्टाचाराची जननी ही आहे. जर हे मूळ आपण शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार संपवू शकणार नाही. आम्हाला खर्चाच्या या वाढत्या प्रमाणाने घाबरवावे आणि एक मजबूत लोकशाही तयार करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलण्याविषयी उद्युक्त करावे, असे ते म्हणाले.

भाजपने 1998 मध्ये 20 टक्के पैसा खर्च केला होता. तर काँग्रेसने 2009 मध्ये एकूण खर्चाच्या 40 टक्के पैसा खर्च केला होता. हा खर्च आता 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित हा अहवाल आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषन करण्यात आले आहे. यानुसार 700 रुपये एका मतदारासाठी खर्च करण्यात आले आहेत. तसेच 12 ते 15 हजार कोटी रुपये थेट मतदात्यांना वाटण्यात आले, तर 20 ते 25 हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी 5 हजार कोटी, औपचारिक खर्च 10 ते 12 कोटी आणि अन्य खर्चासाठी 3 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्य़ात येत असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.

Leave a Comment