ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये भरणार रोबोट आयडाच्या पेंटिंग्सचे प्रदर्शन


सध्या आपली डिजीटल जगताकडे वाटचाल सुरु असून आतापासूनच वेगवेगळ्या कामांसाठी रोबोट तयार केले जात आहेत. असाच एक अनोखा रोबोट वैज्ञानिकांनी तयार केला आहे. पेंटिंग आणि ड्रॉइंग करण्यात हा रोबोट सक्षम आहे. आयडा (Ai-Da) असे नाव या रोबोटला देण्यात आले आहे. तर महिलेचा चेहरा रोबोटला देण्यात आला आहे. आयडा रोबोट तिच्या हातांनी आणि डोळ्यांनी पेंटिंग करते. गणितज्ञ एडा लवलेसच्या नावावरून या रोबोटचे नाव ठेवण्यात आले आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आयडाकडून तयार करण्यात आलेल्या पेंटिंग्स प्रदर्शन भरवले जाणार आहे. १२ जूनला याची सुरूवात होणार असून पेंटिंग, ड्रॉइंग, स्कल्पचर आणि व्हिडीओ आर्टचा या प्रदर्शनीमध्ये समावेश असणार आहे. आयडा आर्टवर्क तयार करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमचा वापर करते.

एडन मेलर यांनी हा रोबोट तयार केला असून ते याबाबत सांगतात की, ही रोबोटिक आर्ट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सुरूवात आहे. आम्हाला आनंद होत आहे की, कागदाला आकार देणारा आणि त्यात रंग भरणारा पहिला प्रोफेशनल मानव रोबोट आर्टिस्ट आम्ही सादर करत आहोत.

इंग्लंडच्या इंजिनिअर्सने या रोबोटचे हात तयार केले आहेत. वैज्ञानिक लूसी सीलनुसार, याची कलात्मक क्षमता लक्षात ठेवून खास प्रकारची प्रोग्रामिंग केली गेली. आशा आहे की, या रोबोटचे काम पसंत केले जाईल. तसेच लोकांना यातून प्रेरणा मिळेल.

Leave a Comment