तुम्ही पाहिले आहेत का चीनमधील रहस्यमयी डोंगर


आपण सर्वसाधारणपणे आजपर्यंत हिरवेगार आणि ओसाड डोंगर पाहिले असतील, पण याच डोंगरावर जर इंद्रधनुष्य अवतरले तर आश्चर्यच म्हणावे लागले. असेच काहीस इंद्रधनुष्य अवतरलेले रहस्यमयी डोंगर चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिऑग्राफिकल पार्कमध्ये आहेत.

अनेक वर्षांपासून विविध रंगांच्या वाळू आणि खनिजांनी बनलेले हे डोंगर सौंदर्याची भुरळ घालत आहेत. या डोंगराचा समावेश युनेस्कोने आपल्या यादीत केला आहे. हा प्रांत चीनच्या उत्तरेकडील किलियन पर्वतरांगेत येतो. याच सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या परिसरात लिंजे आणि सुनन प्रांतही पसरला आहे.

1920 मध्ये हा प्रांत चीनच्या पुरातत्त्ववाद्यांनी शोधून काढला. अशा प्रकारचे सौंदर्य या प्रांतात वसले असल्याचे यापूर्वी स्थानिकांना माहितच नव्हते. वाळूचे खडक आणि गाळाच्या सच्छिद्र खडकांपासून हे डोंगर तयार झाले आहेत. लोह आणि मॅगनिज सारखी खनिजे विपूल प्रमाणात आहेत. शिवाय भूगर्भातील झालेल्या हालचालींमुळे डोंगरात वेगवेगळ्या रंगाचे खडकांचे स्तर पाहायला मिळतात. डेनक्सिया राष्ट्रीय उद्यानाला लिंजे डेनक्सिया सिनिक एरिया असेही म्हटले जाते.

Leave a Comment