…यामुळे केंद्रीय मंत्र्यांना अमित शहांनी झापले


नवी दिल्ली – ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी केले होते. भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि नितीश कुमार यांनी या पार्टीला हजेरी लावली होती. गिरिराज सिंह यांनी पार्टीनंतर ट्विटरवर नितीश कुमारांची प्रशंसा केल्यामुळे फोन करून गिरिराज सिंह यांना नितीश कुमारांबाबत अशाप्रकारे वक्तव्ये करू नका म्हणून चिडलेल्या अमित शहा यांनी बजावले आहे.

इफ्तार पार्टीला जाण्यावरुन बेगुसराय येथून निवडून आलेले गिरिराज सिंह यांनी स्वकीयांना सुनावले होते. पण स्वत: त्यांनी रामविलास पासवान यांच्या इफ्तार पार्टीला जाताना नितीश कुमार आणि अन्य नेत्यांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यांनी यामध्ये लिहिले, की किती सुंदर चित्र असले असते, जेव्हा एवढ्या आवडीने नवरात्रीला फलआहाराचे आयोजन करताना फोटो काढले असते? आपल्या कर्म-धर्मामुळे आपण मागे राहुन दिखाव्यात पुढे राहतो?

नितीश कुमार गिरिराज सिंह यांच्या ट्विटवर स्पष्टीकरण देताना म्हणाले, त्यांनी हे सर्व माध्यमात चर्चेत राहण्यासाठी केले आहे. तर, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी म्हटले, की नितीश कुमार इफ्तार पार्टीही करतात आणि छटपुजाही करतात.

Leave a Comment