भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले


नवी दिल्ली – सोमवारी आसामच्या जोरहाट येथून अरूणाचलकडे उड्डाण केलेले भारतीय वायुसेनेचे विमानाला अपघात झाला होता. वायुसेनेला हे विमान शोधण्यात यश आले असून या अपघातात विमानातील पायलट २९ वर्षीय आशीष तंवर यांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी १२ वाजून २५ मिनिटांनी आसामच्या जोरहाट विमानतळावरून हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाने उड्डाण केले होते. ८ क्रू मेंबरसह ५ प्रवासी या विमानात होते. या विमानाचा उड्डाणानंतर ३५ मिनिटांत रडारपासून संपर्क तुटला. त्यांनतर हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली.

वायुसेनेने हे विमान शोधण्यासाठी सुखोई -३० आणि सी -१३० या विमानांची मोहिम सुरू केली होती. काल या विमानाचे अवशेष शोधण्यात या विशेष शोध मोहीमेला यश आले आहे. या विमानाचे पायलट आशिष तंवर यांना वीरमरण आल्याचे वायुसेनेने जाहीर केले आहे. हरियाणातील पलवल येथील तंवर हे रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Comment