आपल्या कर्मचा-यांना 26 आठवड्याची पॅटर्निटी लिव्ह देणार झोमॅटो


प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आई होणे हा जितका महत्त्वाचा टप्पा असतो, तेवढाच तो पुरुषांसाठी देखील असतो. त्यामुळे आईला आयुष्यात येणा-या नव्या पाहुण्याचे स्वागत जितके करायचे तितकेच एक कर्तव्यदक्ष पिता म्हणून पुरुषांना ही करायची असते. पण नोकरदार पित्यांना अनेकदा आपल्या बाळासोबत ते क्षण घालवता येत नाही. म्हणूनच आपल्या कर्मचा-यांसाठी एक नवीन योजना ऑनलाईन फूड ऑर्डर करणारी शॉपिंग साइट झोमॅटोने सुरु केली आहे. झोमॅटोने पिता होणा-या आपल्या कर्मचा-यांसाठी 26 आठवड्यांची फुलपगारी रजा देण्याचे ठरवले आहेत. सर्वच स्तरातून झोमॅटोच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. विशेषकरुन या निर्णयासाठी नेटक-यांनी झोमॅटोचे विशेष कौतुक केले आहे.

आपल्या ब्लॉगमध्ये झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी सांगितले की, कंपनी कुटूंबाच्या देखभालीसाठी आणि येणा-या प्रत्येक बाळामागे 1000 डॉलर (जवळपास 69,000 रुपये) एवढी रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच गोयल पुढे असेही म्हणाले की, नवीन बाळाचे स्वागत करण्यासाठी माता आणि पित्यांच्या सुट्ट्यांमध्ये तफावत असणे, हे पटण्यासारखे नाही. म्हणूनच आमच्या 13 देशांतील शाखांमध्ये आम्ही महिला कर्मचा-यांना देण्यात येणा-या मॅटर्निटी लिव्ह एवढी पुरुष कर्मचा-यांना पॅटर्निटी लिव्ह देणार आहे. त्याचबरोबर ही योजना सरोगसी, दत्तक घेणा-या आणि समलिंगी असलेल्या पालकांनाही लागू करण्यात आली आहे.

Leave a Comment