डिजीटल इंडियाच्या नावाने फ्री लॅपटॉपची ऑफर देणाऱ्या आयआयटीच्या विद्यार्थ्याला अटक


नवी दिल्ली – नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेअंतर्गत २ कोटी लॅपटॉप केंद्र सरकार मोफत वाटणार आहे. एका वेबसाईटवर यासाठी नोंदणी करा, असे आव्हान करण्यात येत होते. परंतु, एका आयआयटीच्या विद्यार्थ्याने ही वेबसाईट केंद्र सरकारने नाही तर बनवली होती. पोलिसांनी याप्रकरणी राकेश कुमार याला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला मोदींचे सरकार स्थापन झाले म्हणून त्यांच्या नावाने www.modi-laptop.wishguruji.com या नावाने वेवसाईट काढून २ कोटी फ्री लॅपटॉपचे वाटप करणार असल्याची माहिती मिळाली होती. मेक इन इंडियाचा लोगो वेबसाईट खरी वाटण्यासाठी पोस्ट करण्यात आला होता. यावर विश्वास ठेवून लोकांनी फ्री लॅपटॉपसाठी नोंदणी केली होती. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास केला. याप्रकरणी पोलिसांनी वेबसाईट जेथे बनली आहे. तेथील लोकेशन ट्रॅक केली आणि व्हीपीओ पुंडलोता, देगाना (नागौर जिल्हा) येथून राकेश कुमार याला अटक केली आहे, अशी माहिती दिल्ली सायबर सेलच्या पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment