२० जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन


नवी दिल्ली – २० जूनपासून राज्यसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार असून १७ जूनला लोकसभेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही सदनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद २० जून रोजी संबोधित करणार आहेत.

यासंदर्भात राज्यसभेच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलैपर्यंत राज्यसभा चालू राहणार आहे. सदनाच्या एकूण २७ बैठका या सत्रात होणार आहेत. तर १७ जूनपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम १८ तारखेला होणार आहे. लोकसभा सभापतींच्या निवडणुका १९ जून रोजी पार पडणार आहेत. यावर्षीचा अर्थसंकल्प ५ जुलै रोजी सादर करण्यात येणार आहे.

Leave a Comment