पश्चिम बंगालमधील भाजप कार्यालयांवर ममतांचा कब्जा


कोलकाता – भारतीय जनात पक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सुरु झालेला वाद काही केल्या शमताना दिसत नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात भाजप कार्यालयाचे कुलुप तोडून त्यावरुन भाजपचे नाव आणि चिन्ह खोडत स्वत:च्या हाताने तृणमूल पक्षाचे नाव लिहिले.

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीवेळी बंगालमध्ये धरणे आंदोलन सुरू केले होते. ममता या बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील नैहाटी येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर तेथील भाजप कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडायला सांगितल्या नंतर संपूर्ण कार्यालयाचे ममतांनी स्वत: रंगकाम करवून घेतले. त्याचबरोबर त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावरील भाजपचे चिन्ह आणि नाव स्वत:च्या हाताने पुसत तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव लिहिले.

दरम्यान ममता बॅनर्जींनी आरोप केला आहे, की आधी हे कार्यालय तृणमूल काँग्रेस पक्षाचे होते. पण त्यावर भाजपने अनधिकृत ताबा मिळवला होता. आता हे कार्यालय ममता बॅनर्जींनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. याच वेळेस परतताना ममतांच्या ताफ्यासमोर येत भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावरून ममता आक्रमक झाल्या होत्या.

Leave a Comment