480 किलोमीटरचे मायलेज देणारी ह्युंदाईची कार लवकरच होणार लॉन्च


ह्युंदाई मोटर इंडियाची पहिली इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला ह्युंदाई मोटर इंडिया कोना ईव्ही लाँच करणार आहे. या कारचे दोन व्हेरिएंट कंपनी बाजारात उतरवणार आहे. ज्यात एक 39 kwh आणि दुसरे 64kwh बॅटरीसोबत कंपनी लाँच करणार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 480 पेक्षा जास्त किलोमीटरचे मायलेज देऊ शकणार आहे. पण भारतीय बाजारपेठे नेमके कुठले व्हेरिएंट लाँच करणार याचा खुलासा अद्याप कंपनीने केलेला नाही.

नवीन कोना ईव्हीमध्ये 39.2 किलोवॅटची बॅटरी दिली जाऊ शकते. जे 135bhp पॉवर आणि 335Nmचे टॉर्क जनरेट करेल. एकदा पुर्ण चार्ज केल्यानंतर ही 400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सहज पार करु शकते. त्याचबरोबर या कार 0 ते 100 किमी प्रति तास वेग कायम करण्यासाठी केवळ 9.3 सेकंदांचा वेळ लागेल. या व्यतिरिक्त यात जलद चार्जिंग सुविधा देखील मिळणार आहे. या कारला 54 मिनिटात 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते.

नवीन कोना ईव्हीची संभाव्य किंमत सुमारे 25 लाखांच्या जवळपास असू शकते. जर असे घडले तर ती खूप महाग कार ठरु शकते. कंपनी सीकेडी मार्गे या कारला आणेल आणि त्याची बांधणी चेन्नई स्थित ह्युंदाईच्या श्रीपेरुमबुदुर येथील कारखान्यात केली जाईल.

याच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन कोना ईव्हीमध्ये ब्ल्यूइन्क कनेक्टिव्हिटी समाविष्ट केली जाऊ शकते. हे तेच तंत्रज्ञान आहे जे नुकत्याच लॉन्च केलेल्या Venueमध्ये समाविष्ट केली गेली आहे. कारमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि डीआरएल, इलेक्ट्रिक सनरूफ, रेन सेन्सिंग वायपर अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Leave a Comment