हॅकर्सने घातला सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांना गंडा


नवी दिल्ली – आपण आजवर हॅकर्सने अनेकांना गंडा घातल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण आपल्या देशातील एका न्यायाधीशला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असेल. कारण सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांना १ लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला असून हे कृत्य त्यांचे मित्र माजी न्यायाधीश बी. पी. सिंह यांचे अकाउंट हॅक करून करण्यात आले आहे. दिल्लीतील मालवीयनगर पोलीस ठाण्याच्या सायबर गुन्हे विभागात न्या. लोढा यांनी तक्रार दिली आहे.

लोढा यांनी सायबर विभागात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बी. पी. सिंह यांच्यासोबत माजी न्यायमुर्ती ९ एप्रिलच्या रात्री बोलत होते. त्यांनी त्यावेळी त्यांच्या चुलत भावाच्या उपचारासाठी तत्काळ १ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत मी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क तेव्हा होऊ शकला नाही. मी संपर्क न झाल्याने मेलमध्ये दिलेल्या अकाउंट नंबरवर दोन वेळेस ५० हजार रुपये, असे १ लाख रुपये हस्तांतरीत केले.

३० मे रोजी यांनी आपले ई-मेल अकांउट न्यायमुर्ती बी. पी. सिंह यांनी उघडून बघितले असता अकाउंट हॅक झाल्याचे त्यांना कळले. बी. पी सिंह यांचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती आर. एम. लोढा यांना मिळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. मालवीयनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तत्काळ संपर्क साधला. अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती लोढा हे ४१ वे सरन्यायाधीश म्हणून २०१४ साली सेवानिवृत्त झाले आहेत. न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आली होती.

Leave a Comment