‘या’ दिवशी रिलीज होणार विद्युतचा ‘कमांडो ३’


काही महिन्यांपूर्वीच ‘जंगली’ चित्रपटात अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा विद्युत जामवाल झळकला. त्याला ‘कमांडो’ चित्रपटानंतर ‘कमांडो फेम’अशी ओळख मिळाली. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपटाचा आता तिसरा भागही रिलीज होणार आहे. नुकतीच या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.


आत्तापर्यंत बऱ्याच अॅक्शन भूमिका विद्युत जामवालने साकारल्या आहेत. पण, त्याला विशेष लोकप्रियता ‘कमांडो’ चित्रपटातून मिळाल्यामुळेच प्रेक्षकांचाही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. या चित्रपटाचा तिसरा भाग आता ६ सप्टेंबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे. विद्युतसोबत या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्यासोबतच या चित्रपटात अंगीरा धर आणि गुलशन दैवेय्या हे कलाकारही दिसणार आहेत.

विपुल अमृतल शाह यांची निर्मिती आणि रिलाएन्स एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Leave a Comment