गुंतवणूकदारांना चुना लावणारा फर्जी ‘सौदी प्रिन्स’ जेरबंद


जवळपास तीस वर्षांपासून स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेत फसवणुकीच्या गुन्ह्यात १८ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एंथनी गिग्नॅक असे या व्यक्तीचे नाव आहे. वीस वर्षांपासून शाही लाइफस्टाइल ही व्यक्ती जगत होती. शुक्रवारी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार खाजगी विमान आणि महागड्या गाड्यांमध्ये पकडण्यात आलेली व्यक्ती प्रवास करत होती. तसेच महागडे दागिणेही परिधान करत होता. त्याच्याकडे बिझनेस कार्डही होते.

या स्वयंघोषित राजकुमाराच्या खोटेपणाचा शुक्रवारी भांडाफोड झाला आणि १८ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली. फ्लोरिडातील न्यायाधीश म्हणाले की, गिग्नॅक एक ठग आहे. गुंतवणुकदारांकडून त्याने ८० लाख डॉलर लुटण्यासाठी स्वत:ला सौदीचा राजकुमार असल्याचे सांगितले होते.

मिशीगनमधील एका परिवाराने कोलंबियामध्ये जन्मलेल्या गिग्रॅकला दत्तक घेतले होते. अमेरिकेतील अटॉर्नी ओर्शनने सांगितले की, एंथनी हा गुंतवणुकदारांना फसवण्यासाठी गेल्या तीन दशकांपासून तो सौदीचा राजकुमार असल्याचं सांगत होता.

Leave a Comment