‘हे’ तीन बलाढ्य संघ विश्वचषक स्पर्धेनंतर येणार भारत दौऱ्यावर


मुंबई : भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. सोमवारी 2019-20च्या हंगामातील घरच्या मैदानावरील मालिकांचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. भारतीय संघ त्यानुसार घरच्या मैदानावर 5 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 12 ट्वेंटी-20 सामने खेळणार आहे. आगामी 2020 ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने झटपट क्रिकेट सामन्यांना प्राधान्य दिले आहे.

फ्रिडम चषक गांधी-मंडेला मालिकेने या हंगामाची सुरुवात होणार आहे. 15 सप्टेंबरपासून तीन ट्वेंटी-20 व तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन ट्वेंटी-20 व 2 कसोटी सामने खेळेल.

डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. मेन इन ब्लू त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघ दोन हात करेल. दक्षिण आफ्रिका पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे.

असे आहे वेळापत्रक 2019-2020
फ्रिडम चषक -2019 (वि. दक्षिण आफ्रिका)
15 सप्टेंबर – पहिली ट्वेंटी-20, धर्मशाला
18 सप्टेंबर – दुसरी ट्वेंटी-20, मोहाली
22 सप्टेंबर – तिसरी ट्वेंटी-20, बंगळुरू
2 ते 6 ऑक्टोबर – पहिली कसोटी, विशाखापट्टणम
10 ते 14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी, रांची
19 ते 23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी, पुणे

बांगलादेशचा भारत दौरा
3 नोव्हेंबर – पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर – दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर – तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
14 ते 18 नोव्हेंबर- पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेबर – दुसरी कसोटी, कोलकाता

वेस्ट इंडिजचा भारत दौरा
6 डिसेंबर – पहिली ट्वेंटी-20, मुंबई
8 डिसेंबर – दुसरी ट्वेंटी-20, तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर – तिसरी ट्वेंटी-20, हैदराबाद
15 डिसेंबर – पहिली एकदिवसीय, चेन्नई
18 डिसेंबर – दुसरी एकदिवसीय, विशाखापट्टणम
22 डिसेंबर – तिसरी एकदिवसीय, कटक

झिम्बाब्वेचा भारत दौरा – 2020
5 जानेवारी – पहिली ट्वेंटी-20, गुवाहाटी
7 जानेवारी – दुसरी ट्वेंटी-20, इंदूर
10 जानेवारी – तिसरी ट्वेंटी-20, पुणे

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 2020
14 जानेवारी – पहिली एकदिवसीय, मुंबई
17 जानेवारी – दुसरी एकदिवसीय, राजकोट
19 जानेवारी – तिसरी एकदिवसीय, बंगळुरू

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 2020
12 मार्च – पहिली एकदिवसीय, धर्मशाला
15 मार्च – दुसरी एकदिवसीय, लखनऊ
18 मार्च – तिसरी एकदिवसीय, कोलकाता

Leave a Comment