या देशात वाढत पोकेमॉन वेडिंगची क्रेझ


सध्याच्या घडीला जगभरात अनेक पद्धतीने लग्न केल्याच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील. त्यातच एका विशिष्ट पद्धतीत लग्न करण्यासाठी वेडिंग प्लॅनरची गरज लागते. त्यातच या वेडिंग प्लॅनर कंपन्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. लग्न सोहळ्यात वेगळेपणा आणण्यासाठी या कंपन्या वेगळवेगळ्या थीम आजमावत असतात. यातच भर म्हणून की काय जपानच्या ESCRIT नावाच्या कंपनीने एक वेगळीच थीम आणली आहे. या थीमचे नाव Pokemon Wedding असे आहे.

Pokemon Wedding थीमच्या माध्यमातून लग्न करणाऱ्या जोडप्यांकडे दोन पिकाचू उभे असतात. यात एक मेल आणि एक फिमेल असते. ते दोघेही लग्न करतात. पाहुण्यांची काळजी घेतात. नवरी-नवरदेवासारखे ते सगळेकाही करतात. त्याचबरोबर या लग्नात पदार्थ सुद्धा पोकेमॉन स्पेशल असतात.

सामान्य सरकारी कागदपत्रांसारखे या लग्नाचे सर्टिफिकेट नसून ते पोकेमॉन स्टाइलचे असतं. यात थोडी क्रिएटीव्हिटी बघायला मिळते. आता भारतातही लग्नात वेगवेगळ्या कॉन्सेप्ट येऊ लागल्या आहेत. वेडींग फोटोशूटने आधीच मार्केट गजबजलेले आहे. नवे काहीतरी वेडींग प्लॅनरही शोधत असतात. त्यामुळे असे काही लवकरच भारतातही बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

Leave a Comment