बाबुल सुप्रियो भडकलेल्या ममतादीदींसाठी वापरणार ‘हा’ फॉर्म्युला


कोलकाता : ‘जय श्री राम’ या घोषणांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी यावरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाना साधला असून ‘मुन्नाभाई’ फॉर्म्युला वापरणार आहेत.

एक अनुभवी नेत्या ममता बॅनर्जी असून त्यांचा ‘जय श्री राम’च्या घोषणेवरुन व्यवहार असामान्य आणि विचित्र आहे. ममता बॅनर्जी राज्यातील भाजपचा प्रदर्शनामुळे चकित झाल्या आहेत. काही दिवसांसाठी त्यांनी ब्रेक घेतला पाहिजे. त्यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातील जनता ‘गेट वेल सून’चे कार्ड पाठविणार आहे, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले होते.

सोमवारी मीडियाशी बाबुल सुप्रियो यांनी चर्चा केली. त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर भाष्य केले. ते म्हणाले, एक अनुभवी नेत्या त्या असून असामान्य आणि विचित्र असा त्यांचा व्यवहार आहे. ज्या पदावर त्या आहेत, त्याची प्रतिष्ठा त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. काही दिवसांसाठी त्यांनी ब्रेक घेतला पाहिजे. त्या बंगालमधील भाजपच्या प्रदर्शनामुळे चकित झाल्या आहेत.

Leave a Comment