कॅबिनेट मंत्रीपदाचा अजित डोभाल यांना दर्जा..!


नवी दिल्ली – कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आला आहे. याची घोषणा मोदी सरकारद्वारे करण्यात आली. त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यकाळही ५ वर्षांनी वाढवण्यात आला आहे.

डोभाल आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदासोबतच कॅबिनेटमध्येही सहभागी असतील. त्यांचे गेल्या अनेक वर्षांमधील योगदान पाहून ही बढती त्यांना मिळाली. मोदींच्या मागील कार्यकाळात डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांनी केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम बजावले.

डोभाल यांच्या नेतृत्वातच बालाकोट एअर स्ट्राईक आणि २०१६ साली सर्जिकल स्ट्राईक मोहीम पार पडली होती. जगातील सर्वाधिक प्रभावशाली अधिकाऱ्यांमध्ये डोभाल यांची गणना केली जाते. मोदींनी त्यांची नियुक्ती मागील कार्यकाळात विशेष सुरक्षा दलाच्या सचिवपदीही केली होती. अजित डोभाल हे १९६८ च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नियुक्तीच्या ४ वर्षानंतर १९७२ साली त्यांची गुप्तचर खात्यात निवड करण्यात आली होती.

Leave a Comment