रविकिशन म्हणतात, योगी आमची श्रीकृष्ण तर मी त्यांच्या अर्जुन


लखनऊः नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून भोजपुरी अभिनेता आणि भाजपचे उमेदवार नवनिर्वाचित खासदार रविकिशन यांनी मोठा विजय मिळवल्यानंतर आता त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतिसुमने उधळली असून त्यांनी योगी आपले भगवान श्रीकृष्ण आहेत अन् त्यांचा मी अर्जुन असल्याचे म्हटले आहे. योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2017मध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या जागेवरून भाजप पराभूत झाला.

रविकिशन म्हणाले, योगी आदित्यनाथ आमचे भगवान श्रीकृष्ण असून मी त्यांचा अर्जुन आहे. त्यांच्या नेतृत्वात मला गोरखपूरला उत्तर भारतातील सर्वश्रेष्ठ शहरांमधील एक बनवायचे आहे. गोरखपूरमध्ये शहरीकरण वाढत चालले असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. उड्डाणपुलांची अनेक शहरांमध्ये कमतरता आहे. मी त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पाठपुरावा करणार आहे. मला आशा आहे की, वाहतुकीची ही समस्या लवकरात लवकर सुटेल, असेही रविकिशन म्हणाले आहेत.

Leave a Comment