तुम्ही पाहिले आहे का ऋतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चे नवे पोस्टर


बऱ्याच दिवसांपासून ऋतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली असून या चित्रपटाच्या रिलीज तारखा वेळोवेळी बदलण्यात येत होत्या. पण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


आनंद कुमार या गणिततज्ञाची भूमिका ऋतिक रोशन या चित्रपटात साकारणार आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून आनंद कुमार आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही अलिकडेच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांच्या भरभरुन कमेंट्स देत आहेत.

Leave a Comment