पॉर्न साइटला प्रमोट करण्यासाठी एक अभिनेत्री घुसली मैदानात


एक विचित्र घटना युरोपीयन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात घडली असून चक्क स्वीमसूटवर मैदानात एक अभिनेत्री घुसल्याने सामना मधेच थांबवावा लागला. लिव्हरपूलने लिव्हरपूल आणि टॉटनहॅम यांच्यात झालेल्या सामन्यात 14 वर्षांनी पुन्हा विजेतेपद पटकावले. एक अभिनेत्री यावेळी मैदानावर स्वीमसूट घालून आल्याने सामना थांबवण्यात आला.

हा पब्लिसीटी स्टंट किंग्से वोलांस्की नावाच्या या मॉडेलने केल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाली. मैदानावर जात असलेला व्हिडिओ वोलांस्कीने सोशल मीडियावर शेअर केला. तर तिचे अकाउंट इन्स्टाग्रामने ब्लॉक केले आहे.

लिव्हरपूलने 2-0 ने टॉटनहॅमवर विजय मिळवून सहाव्यांदा युरोपीयन चॅम्पियन लीगचे विजेतेपद पटकावले. लिव्हरपूलने युरोपीय चॅम्पियन्स लीगमध्ये टॉटनहॅमला 2-0 ने पराभूत करत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. त्यांना यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. मोहम्मद सलाह आणि डिवॉक ओरिगी यांनी लिव्हरपूलच्या विजयात निर्णायक गोल केले.

लिव्हरपूलने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलला जबरदस्त कामगिरी करून फायनलला पोहचलेल्या टॉटनहॅमला पराभूत केल्यामुळे युरोपीय चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पहिल्यांदाच उद्ध्वस्त झाले. याआधी लिव्हरपूलने 1977, 1978, 1981, 1984 आणि 2005 मध्ये विजय मिळवला होता. 2012 नंतर युरोपीयन चॅम्पियन लीग जिंकणारा लिव्हरपूल हा पहिला इंग्लिश क्लब आहे.

Leave a Comment