आयकर अधिकाऱ्याने सापाला तोंडाने पाणी पाजून वाचवला जीव


आपल्या समोर जर एखादा साप गेला तर आपली काय अवस्था होईल हे काही सांगायला नको. पण त्यावेळी आपली झालेली अवस्था आपल्याला काही करण्यास परावृत्त करते. त्यातच त्या सापाला मारण्याचा देखील प्रयत्न केला जातो. पण तुम्ही कधी असे ऐकले आहे का एखाद्याने स्वत:च्या जीवाची बाजी लावून सापाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे. पण अशी एक घटना आता इंदौरमध्ये समोर आली आहे. तोंडाने पाणी पाजून शेरसिंह या व्यक्तीने सापाचा जीव वाचवला आहे. सापाला घाबरून इंदौरमध्ये एका शाळेच्या परिसरात लोकांनी त्याच्यावर कीटकनाशक टाकले.


साप या कीटकनाशकामुळे बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तिथे उपस्थित असलेले आयकर अधिकारी शेरसिंह यांनी आपल्या तोंडाने सापाला पाणी पाजले. सापाला जास्त पाणी पाजल्याने उलटी करण्यास मदत झाली आणि त्याच्या पोटातील कीटकनाशक बाहेर पडले. शेरसिंह यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, पूर्ण उपचारानंतर जखमी सापाला वनक्षेत्रात सोडण्यात येणार आहे.

Leave a Comment