
सध्या टीव्ही शो ‘नजर’मध्ये भोजपूरी बोल्ड अभिनेत्री मोनालिसा डायनची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावरही मोनालिसा खूप सक्रिय असून नेहमीच ती तिचे हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
आपल्या हॉट अदांनी घायाळ करत आहे छोट्यापडद्यावरील डायन
नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरून मोनालिसाने एक फोटो शेअर केला. ती ज्यात बिकीनीमध्ये दिसत आहे. मोनालिसाने या फोटोला ‘Sometimes A Game Comes At Just The Right Moment In Life …. #metime #peace #serene’ असे कॅप्शन दिले आहे. मोनालिसाने याआधीही तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मोनालिसा स्टार प्लस वरील मालिका ‘नजर’मध्ये मोहनाची भूमिका साकारत आहे. जी एक डायन आहे. मोनालिसाने या मालिकेत काही अॅक्शन सीनही दिले आहेत. मोनालिसाचा भोजपूरी चित्रपट पाकिस्तान में जय श्रीराम नुकताच रिलीज झाला. ती तिचा पती विक्रांत सिंह राजपूतसोबत या चित्रपटामध्ये दिसली.
