जान्हवीच्या हातात असलेली गुलाबी बाटली आहे एवढ्या किंमतीची


आपल्यापैकी प्रत्येकालाच बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला आज जान्हवी कपूरच्या लाइफस्टाइलची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत.

आतापर्यंत जान्हवीने बॉलिवूडमध्ये फक्त एकच चित्रपट केला आहे. पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या स्टायलिश लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या या गुलाबी बाटलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ही बाटली जान्हवीसोबत अनेकदा दिसते. पण या बाटलीची किंमत तुम्हाला माहीत आहे का?

ही बाटली जिमच्या बाहेर असो किंवा चित्रपटाच्या सेटवर जान्हवीसोबत नेहमीच असते. ही बाटली ती बॅगेतही ठेवत नाही. सतत ती तिच्या हातात असते. त्याचबरोबर या बाटलीला तिने नावही दिले आहे.

यूट्यूबवरील एका व्हिडिओनुसार, जान्हवीला तिच्या बॅग, कॉफी मग आणि पाण्याची बाटली दाखवायला फार आवडते. तिने या तिघांना ‘चुस्की फॅमिली’ असे नाव ठेवले आहे. जर तुम्ही ही बाटली निरखून पाहिली तर त्यावर तुम्हाला ग्लिटरी टच दिसेल.

३ हजार २२५ रुपये एवढी जान्हवीच्या या बाटलीची किंमत आहे. सर्वसामान्यपणे पाण्याच्या बाटल्या या २०० ते ३०० रुपयांच्या किंमतीत मिळतात. पण जान्हवीच्या बाटलीची किंमत वाचून अनेकांना धक्काच बसतो. जान्हवीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ती ‘तख्त’, ‘रणभूमी’ आणि ‘रुह अफ्जा’ या चित्रपटांमध्येही दिसेल.

Leave a Comment