सेव्ह नसलेला नंबर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्याची सोपी पद्धत!


जगभरात इंस्टन्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे लाखो-करोडो युजर्स असून युजर्ससाठी व्हॉट्सअॅप वेळोवळी नवनवे फिचर्स सादर करत असते. यातील ग्रुप चॅट हे फिचर चांगलेच लोकप्रिय ठरल्यामुळे अनेकांशी एकावेळी संवाद साधणे खूप सोपे झाले. आपल्याला व्हॉट्सअॅपच्या अनेक फिचर्सबद्दल पुरेशी माहिती नाही.

तुम्हाला जर कोणाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करायचे असेल तर आपल्याकडे त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह असणे गरजेचे आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का? नंबर सेव्ह न करताही तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्या व्यक्तीला अॅड करु शकता. व्हॉट्सअॅपने अलिकडेच ग्रुप इनवाईट लिंक फिचर सुरु केले असून अॅडमिन त्याच्या मदतीने नंबर सेव्ह केल्याशिवाय युजरला ग्रुपमध्ये अॅड करु शकतो.

मोबाईल नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप मेसेजिंग अॅप होम स्क्रिनवर ओपन करा. त्यानंतर ग्रुप विंडो ओपन करा. उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा. यात दिसणाऱ्या पर्यायांपैकी ‘ग्रुप इंफो’ पर्यायावर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि ‘इनवाईट व्हाया लिंक’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सेंड लिंक व्हाया व्हॉट्सअॅप, कॉपी लिंक, शेअर लिंक, रिवोक लिंक यांसारखे पर्याय दिसतील. याच्या मदतीने तुम्ही नंबर सेव्ह न करता ग्रुपमध्ये अॅड करु शकता. ज्या युजरला तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करायचे आहे त्याला ही लिंक पाठवा. तुम्ही या सोप्या स्टेप्ससह नंबर सेव्ह न करता युजरला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करु शकता.

Leave a Comment