अनुदानित आणि विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर महाग


नवी दिल्ली – आजपासून १ रुपया २३ पैशाने घरगुती स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरचे दर वाढले आहेत. तर २५ रुपयांची दरवाढ बिगर अनुदानित सिलेंडर करून सरकारने मोठा झटका दिला आहे.

४९७ रुपये ३७ पैसे राजधानीत अनुदानित सिलेंडरची किंमत आहे. तर बिगर अनुदानित सिलेंडरची किंमत ही ७३७ रुपये ५० पैसे एवढी आहे. एलपीजी गॅसचे मासिक दर आज सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने घोषित केले आहेत. घरगुती वापरासाठी ग्राहकांना १४.२ किलोचा अनुदानित सिलेंडर वापरता येतो. सरकारने सलग चौथ्यांदा या अनुदानित सिलेंडरचे दर वाढविले आहेत. ग्राहकांना १२ सिलेंडरसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. त्यामुळे १२ हून अधिक सिलेंडर घेणाऱ्यांना ग्राहकांना दरवाढीची मोठी झळ बसणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल -डिझेलचे दर नियंत्रणात होते. मात्र निवडणुकीच्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी १९ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढले आहेत.

Leave a Comment